Virat, Anushka आणि Deepika, Ranveer Singh नंतर आता हा अभिनेता ही चढणार बोहल्यावर | Lokmat News

2021-09-13 0

जाने तू या जाने ना’, ‘एक दीवाना था’, ‘धोबी घाट’ या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता प्रतिक बब्बर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्याची प्रेयसी सान्या सागर हिच्याशी येत्या २२ जानेवारीला लखनऊ येथे त्याचा साखरपुडा होईल. ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा तो मुलगा आहे. प्रतिकला अमली पदार्थ सेवन करण्याची सवय होती. मात्र, गेल्याच वर्षी तो या विळख्यातून बाहेर पडला. त्यानंतर आता तब्बल तीन वर्षांनी ‘बागी २’ चित्रपटातून तो रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अहमद खान दिग्दर्शित या चित्रपटात प्रतिक खलनायकाची भूमिका साकारणार असून, तथाकथित प्रेमीयुगुल टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यात मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
[


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires